क्रीडा घडामोडी / व्यक्तिविशेष
सर्वेश कुशारे : नाशिक ते ऑलम्पिक - प्रवास आणि यश
१. वैयक्तिक माहिती (Personal Details)
- नाव : सर्वेश कुशारे
- क्रीडा प्रकार : उंच उडी (High Jump)
- मूलनिवासी : देवगाव (तालुका - निफाड, जिल्हा - नाशिक)
- शिक्षण : कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली
२. क्रीडा क्षेत्रातील कामगिरी व यश (Key Achievements)
- राष्ट्रकुल स्पर्धा (Commonwealth Games) २०२६ : राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक (Glasgow) पटकावले.
- ऑलिम्पिक मधील ऐतिहासिक कामगिरी : ऑलिम्पिक स्पर्धेत धडक मारणारा सर्वेश हा पहिला भारतीय उंच उडीपटू ठरला आहे.
- सैन्यदलात भरती : उत्कृष्ट क्रीडा कामगिरीच्या जोरावर २०१६ मध्ये सैन्यदलात (Senadal) निवड झाली.
३. प्रशिक्षक आणि प्रशिक्षण केंद्र (Coaches & Training Centers)
- बालेवाडी (पुणे, २०११) : मार्गदर्शक - गजानन पाटील.
- छत्रपती शिवाजी क्रीडांगण (सांगली) : एनआयएस (NIS) प्रशिक्षक - एस. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य आत्मसात केले.
४. क्रीडा प्रवासातील टप्पे आणि यश
- २०१९ : काठमांडू दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत २.२१ मीटर उडी मारत पहिले सुवर्ण पदक.
- २०२३ : बँकॉक येथील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत २.२६ मीटर उडी मारून रौप्य पदक
- २०२४ : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत ऑलिम्पिक महोत्सवात सहभाग.
- २०२५ : टोकियो जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला भारतीय पुरुष उंच उडीपटू ठरत ६ वा क्रमांक पटकावला (२.२८ मीटर)
- २०२६ (राष्ट्रीय विक्रम) : भुवनेश्वर येथे राष्ट्रीय आंतर-राज्य स्पर्धेत २.३१ मीटर उंच उडी मारत नवा राष्ट्रीय विक्रम
- २०२६ (ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धा) : ग्लासगो येथे २.२५ मीटरची उत्कृष्ट उडी मारून ऐतिहासिक रौप्य पदक आपल्या नावावर केले.